पिंपरी चिंचवड शहर पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी सायली कुलकर्णी उपाध्यक्षपदी विनय लोंढे यांची नियुक्ती!


पिंपरी चिंचवड शहर पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी सायली कुलकर्णी उपाध्यक्षपदी विनय लोंढे यांची नियुक्ती !
पिंपरी ( प्रतिनिधी) पिंपरी चिंचवड शहर पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ पत्रकार सायली कुलकर्णी तर उपाध्यक्षपदी विनय लोंढे यांची आज नियुक्ती करण्यात आली आहे.
अखिल भारतीय मराठी पत्रकार संस्था ( रजि.) या संस्थेशी संलग्न असलेल्या पिंपरी चिंचवड शहर पत्रकार संघाच्या नवीन पदाधिकाऱ्यांची निवड पुढील एक वर्षासाठी करण्यात आली आहे.
पिंपरी महापालिका मुख्य इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावरील कार्यालयात बैठक घेण्यात आली. बैठकीस अनेक पत्रकार उपस्थित होते. सन २०२४ ते २०२५ या वर्षासाठी पुढील प्रमाणे पदाधिकाऱ्यांची निवड करण्यात आली आहे.
अध्यक्ष – सायली कुलकर्णी,
उपाध्यक्ष – विनय लोंढे,
सेक्रेटरी – संतोष जराड,
कोषाध्यक्ष – गणेश शिंदे,
सदस्य– बापूसाहेब गोरे, विश्वास शिंदे, अशोक लोखंडे.