सुकलेल्या तलावात कमळं फुलवतोय BJP : शिवसेना

भाजपला दूर ठेवून महाराष्ट्रात सत्ता स्थापन करण्यात यशस्वी ठरलेल्या शिवसेनेनं भाजपवर टीकेचा भडिमार सुरूच ठेवला आहे. दिल्ली विधानसभेच्या निवडणुकीच्या निमित्तानं आम आदमी पक्षाचे नेते व दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांचं कौतुक करतानाच शिवसेनेनं भाजपला जोरदार टोले हाणले आहेत. ‘भाजप सुकलेल्या तलावात कमळं फुलवीत आहे,’ अशी बोचरी टीका ‘सामना’च्या अग्रलेखातून करण्यात आली आहे. भाजप सुकलेल्या तलावात कमळं फुलवतोय: शिवसेना

मुंबई: भाजपला दूर ठेवून महाराष्ट्रात सत्ता स्थापन करण्यात यशस्वी ठरलेल्या शिवसेनेनं भाजपवर टीकेचा भडिमार सुरूच ठेवला आहे. दिल्ली विधानसभेच्या निवडणुकीच्या निमित्तानं आम आदमी पक्षाचे नेते व दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांचं कौतुक करतानाच शिवसेनेनं भाजपला जोरदार टोले हाणले आहेत. ‘भाजप सुकलेल्या तलावात कमळं फुलवीत आहे,’ अशी बोचरी टीका ‘सामना’च्या अग्रलेखातून करण्यात आली आहे.

केजरीवाल ‘लय भारी’ अशा शीर्षकाखाली असलेल्या ‘सामना’च्या अग्रलेखातून दिल्लीतील सध्याच्या राजकीय परिस्थितीवर भाष्य करण्यात आलं आहे. दिल्ली विधानसभा जिंकण्यासाठी देशातले २०० खासदार, भाजपचे सर्व मुख्यमंत्री, संपूर्ण केंद्रीय मंत्रिमंडळ कामाला लागले असतानाही एक केजरीवाल सगळ्यांना भारी पडत आहेत, असं अग्रलेखात म्हटलं आहे. दिल्लीत काँग्रेसचे अस्तित्व फारसे उरले नाही. भाजप सुकलेल्या तलावात कमळे फुलवीत आहे. त्यांच्या या नव्या ‘फुलोत्पादना’ला आमच्या शुभेच्छा, अशी खोचक टिप्पणीही करण्यात आली आहे.

Latest News