सांगलीच्या महापौरपदी भाजपच्या गीता सुतार, काँग्रेस-राष्ट्रवादीला मात

सांगलीच्या महापौरपदी भाजप नगरसेविका गीता सुतार यांची, तर उपमहापौरपदी आनंदा देवमाणे यांची वर्णी लागली आहे.

सांगली : सांगली महापालिकेच्या महापौर आणि उपमहापौरपदावर भाजपचा झेंडा फडकला आहे. भाजप नगरसेविका गीता सुतार यांची महापौरपदी, तर उपमहापौरपदी आनंदा देवमाणे यांची वर्णी लागली आहे. सांगली महापौरपदाच्या निवडणुकीत भाजप विरुद्ध काँग्रेस-राष्ट्रवादी अशी थेट लढत झाली.

भाजपच्या गीता सुतार आणि आनंदा देवमाणे या दोघांनाही प्रत्येकी 43 मतं मिळाली. महापौरपदाच्या शर्यतीत असलेल्या काँग्रेसच्या वर्षा निंबाळकर यांना 35 मतं मिळाली. तर उपमहापौरपदाची निवडणूक लढवणाऱ्या योगेंद्र थोरात यांनाही 35 मतं पडली.

महापौरपदाच्या निवडणुकीत फोडाफोडी टाळण्यासाठी भाजपने खबरदारी घेतली होती. भाजपचे सर्व नगरसेवक एकत्रित मोठ्या बसमधून महापालिकेत आले होते.

सांगली महापालिकेतील पक्षीय बलाबल भाजप – 41 भाजपचे सहयोगी अपक्ष – 02 काँग्रेस – 20 राष्ट्रवादी – 15

Latest News