पिंपरी महापालिकेच्या खड्डा बूजविताना दर्जा न ठेवणाऱ्या स्थापत्य विभागातील 26 कनिष्ठ अभियंत्यांना नोटीस


पिंपरीतील २६ अभियंत्यांना नोटीस
पिंपरी (प्रतिनिधी) :पिंपरी-चिंचवड शहरातील नागरिकांच्या तक्रारींकडे दुर्लक्ष करणे आणि खड्डे बुजविताना दर्जा न ठेवणाऱ्या महापालिकेच्या २६ कनिष्ठ अभियंत्यांना शहर अभियंत्यांनी नोटीस बजावण्यात आली आहे.

यामध्ये ‘अ’ क्षेत्रीय कार्यालयातील दोन, ‘ब’ चार, ‘क’ सात, ‘ड’ चार, ‘इ’ एक, ‘फ’मध्ये तीन, ‘ग’ मधील एक आणि ‘ह’ मध्ये चार अशा २६ अभियंत्यांवर कारवाईचा बडगा उगारण्यात आला आहे
. या सर्व अभियंत्यांना नोटीस देण्यात आली आहे. तसेच याबाबत तीन दिवसांमध्ये लेखी खुलासा मागवण्यात आला आहे. समाधानकारक खुलासा नसल्यास त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल, असे शहर अभियंता मकरंद निकम यांनी सांगितले आहे
तीन दिवसांमध्ये लेखी खुलासा; अन्यथा कारवाईचा बडगा उगारला आहे
निगडीच्या भक्ती-शक्ती समूह शिल्प चौकापासून चिंचवडपर्यंत महामेट्रोकडून मेट्रो मार्गिकेचे काम सुरू असल्याने रस्ता अरुंद झाला आहे.
दरम्यान, शहरात ४११ खड्डे असल्याचा प्रशासनाचा दावा आहे. मुख्य आणि अंतर्गत रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात खड्डे पडल्याने रस्त्यांची चाळण झाल्याने महापालिका प्रशासनाने कठोर पावले उचलण्यास सुरुवात केली आहे
पिंपरी-चिंचवड महापालिकेने या वर्षीपासून खड्डे व्यवस्थापन प्रणाली विकसित केली आहे. त्या अंतर्गत ‘पॉटहोल मॅनेजमेंट’ हे अॅप विकसित करण्यात आले. या अॅपमुळे खड्ड्यांची तक्रार नोंदवणे आणि त्यांचे निराकरण करण्याची प्रक्रिया सोपी व सुलभ करण्यात आली आहे.
अॅपवरील तक्रारींकडे कानाडोळा करणे, नियमानुसार आणि खड्डे बुजविताना दर्जा न ठेवणे कनिष्ठ अभियंत्यांना चांगलेच भोवले आहे. महापालिकेच्या आठही क्षेत्रीय कार्यालया अंतर्गत असणाऱ्या रस्त्यांची अवस्था खराब झाली आहे
. शहरातील विविध भागातील रस्त्यांवर एक हजार ८७५ खड्डे पडले होते. त्यापैकी डांबर, कोल्ड मिक्सने ६५४, खडीने ७७, जीएसबीने ५७०, पेव्हिंग ब्लॉकने १४, सिमेंट काँक्रीटने १८७ असे एक हजार ४६४ खड्ड्यांची दुरूस्ती केली आहे. तर सध्या शहरात केवळ ४११ खड्डे असल्याचे महापालिका प्रशासनाने स्पष्ट केले आहे. तीच अवस्था दापोडी ते निगडी येथील रस्त्याची झाली आहे