पुणे जिल्ह्यातील ५७ विद्यार्थ्यांनी राज्य गुणवत्ता यादीत स्थान…

(पुणे :ऑनलाइन न्यूज परिवर्तनाचा सामना)

पुणे जिल्ह्यातील ५७ विद्यार्थ्यांनी राज्य गुणवत्ता यादीत स्थान मिळवलं. यामध्ये ग्रामीण भागातून ३७ आणि शहरी भागातून २० विद्यार्थी सहभागी आहेत. विशेषतः यामध्ये ४० विद्यार्थी खाजगी अनुदानित मराठी शाळांमधून आहेत. ही कामगिरी शिक्षणातील एकूणच दर्जात्मक सुधारणा आणि शिक्षकांच्या समर्पणाची साक्ष देणारी आहे. स्पर्धात्मक वातावरणातही मराठी शाळांनी विद्यार्थ्यांना तयार करून उत्कृष्ट निकाल साधला आहे

पुणे जिल्हा परिषदेचे प्रशासक तथा मुख्य कार्यकारी अधिकारी मा. गजानन पाटील आणि प्राथमिक शिक्षणाधिकारी मा. संजय नाईकडे यांनी या गुणवंत विद्यार्थ्यांचे, त्यांचे शिक्षक, पालक आणि शाळांचे मनःपूर्वक अभिनंदन केले. “ही कामगिरी ही जिल्ह्याच्या शैक्षणिक प्रगतीचे प्रतीक आहे. ही परंपरा अबाधित राहावी,” असे पाटील साहेबांनी नमूद केले.

या निकालाच्या निमित्ताने जिल्ह्यातील शैक्षणिक कार्यपद्धती, विद्यार्थ्यांचे नियोजनबद्ध मार्गदर्शन आणि गुणवत्तेच्या दिशेने होणारी वाटचाल अधोरेखित झाली आहे. महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या फेब्रुवारी २०२५ मध्ये घेण्यात आलेल्या इयत्ता ५वी व ८वी शिष्यवृत्ती परीक्षांचा निकाल नुकताच जाहीर झाला असून, पुणे जिल्ह्याने या परीक्षेत राज्यात अव्वल कामगिरी करत शैक्षणिक गुणवत्तेची ठसा उमटवला आहे.

एकूण १२०३ विद्यार्थी राज्य गुणवत्ता यादीत झळकले असून, यातील तब्बल ७१० विद्यार्थी हे जिल्हा परिषद शाळांमधील आहेत. या यशामुळे जिल्हा परिषदेच्या तसेच खाजगी मराठी शाळांनी आपली गुणवत्ता पुन्हा सिद्ध केली आहे.

विशेष म्हणजे, या यादीतील बहुतांश विद्यार्थी मराठी माध्यमातील असून, ही बाब शासन व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शिक्षणात दिलेल्या योगदानाचे सशक्त उदाहरण आहे. पूर्व माध्यमिक (इयत्ता ५वी) शिष्यवृत्ती परीक्षेत पुणे जिल्ह्याचे एकूण ६८ विद्यार्थी राज्य गुणवत्ता यादीत आहेत.

त्यामध्ये ग्रामीण विभागातून ३७, शहरी विभागातून १९ आणि CBSE/ICSE बोर्डातून १२ विद्यार्थ्यांनी स्थान मिळवलं आहे. विशेष बाब म्हणजे, यातील ४७ विद्यार्थी हे जिल्हा परिषदेच्या शाळांमधील आहेत.ही कामगिरी विद्यार्थ्यांच्या मेहनतीबरोबरच त्यांच्या शिक्षकांच्या मार्गदर्शनाची आणि पालकांच्या सहकार्याची साक्ष देणारी आहे.

ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनीही शहरातील विद्यार्थ्यांइतकीच गुणवत्ता दाखवत शैक्षणिक समतेचं उदाहरण घालून दिलं आहे.

माध्यमिक (इयत्ता ८वी) शिष्यवृत्ती परीक्षेत .

Latest News