हिंजवडी मधील मेट्रो,नोकरदार, उद्योजक आणि सोसायट्यांमधील नागरिकांचे प्रश्न नक्कीच सुटणार…

पिंपरी । (ऑनलाइन न्यूज परिवर्तनाचा सामना)

हिंजवडी आयटी पार्कमधील वाढत्या नागरी व वाहतूक समस्यांकडे लक्ष वेधण्यासाठी IT फोरम आणि सोसायटी फेडरेशनच्या प्रतिनिधींनी गुरुवारी विधानभवनात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेतली.

ही महत्त्वपूर्ण बैठक भाजपाचे आमदार महेश लांडगे यांच्या पुढाकाराने आयोजित केली होती. यावेळी आयटी फोरमचे सचिन लोंढे, सोसायटी फेडरेशनचे संजीवन सांगळे , बाणेर-बालेवाडी रेसिडेन्ट असोसिएशनचे अमेय जगताप, सारंग वाबळे, महाळुंगे रेसिडेन्ट असोसिएशनचे पवनजीत माने आदि उपस्थित होते

हिंजवडीसारख्या आंतरराष्ट्रीय दर्जाच्या आयटी हबसाठी भक्कम रस्ते, सार्वजनिक वाहतूक व नियोजन महत्त्वाचे आहे. या दृष्टिकोनातून आगामी काळात या भागामध्ये अंडरपास, पर्यायी रस्ते, मेट्रोची डेडलाईन काटेकोरपणाने पाळली जाईल.

विभागीय आयुक्तांच्या माध्यमातून सिंगल पॉईंट ॲथॉरिटीद्वारे सर्व समन्वय करण्याच्या सूचना मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी दिल्यामुळे हिंजवडीतील समस्या सुटण्यासाठी आशादायी चित्र निर्माण झाल्याच्या भावना व्यक्त करण्यात येत आहेत.

बाणेर बालेवाडी पाषाण रेसिडेन्स असोसिएशनचे अमेय जगताप म्हणाले, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सर्वप्रथम जबाबदार सर्व विभागांना एकत्रितरित्या समोरासमोर आणून बैठक घेतली. यातून समस्या नक्की कुठे निर्माण होत आहेत याची माहिती मिळाली

. हद्दीचा वाद, भूसंपादन, अर्धवट कामे यावर ‘ऑन द स्पॉट’ चर्चा झाली. हिंजवडी आयटी पार्क मधील प्रस्तावित रस्ते आणि पायाभूत सुविधा सक्षम करण्यासाठी ‘फास्टट्रॅक’ वर कालबद्ध नियोजन करण्यात येणार आहे

.बाणेर बालेवाडी पाषाण रेसिडेन्स असोसिएशनचे सारंग वाबळे म्हणाले, बाणेर, बालेवाडी आणि पाषाण हा भाग वाहतूक कोंडीच्या विळख्यात अक्षरशः सापडला आहे दहा मिनिटाच्या कामासाठी दीड ते दोन तास वाहतूक कोंडीमध्ये अडकावे लागते. याची माहिती मुख्यमंत्री महोदयासमोर आम्ही मांडली.

ही वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी तातडीने उपाय योजना करण्यात याव्या असे देखील सांगितले. मुख्यमंत्र्यांकडून सूर्य हॉस्पिटलपासून वाकडमार्गे हिंजवडी फेज ३ पर्यंत PMRDA हद्दीतून ३० मीटर रुंदीचा पर्यायी रस्ता आरक्षित करून विकसित करण्याबाबतचा पर्याय ठेवण्यात आला आहे

चिखली मोशी सोसायटी फेडरेशनचे अध्यक्ष संजीवन सांगळे म्हणाले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हिंजवडी तसेच पिंपरी चिंचवड मधील उद्योजकांना भेडसावणारे अनेक समस्यांबाबत तातडीने बैठक घेत समस्यांची दखल घेतली. याबद्दल मुख्यमंत्र्यांचे आभार व्यक्त करणे आवश्यक आहे. पहिल्यांदाच सर्व जबाबदार विभाग एकत्र येत समन्वयातून प्रश्न सुटण्याबद्दल चर्चा झाली.

पर्यायी रस्ते अंडरपास, उड्डाणपूल तसेच हिंजवडी मधील मेट्रो यातून नोकरदार, उद्योजक आणि सोसायट्यांमधील नागरिकांचे प्रश्न नक्कीच सुटणार आहेत. आमदार महेश लांडगे यांच्या माध्यमातून तातडीने बैठक आयोजित करण्यात आली

आमच्या समस्या थेट मुख्यमंत्र्यांसमोर मांडता आल्या. महत्त्वाचे म्हणजे सिंगल ऍथॉरिटी नेमून कालबद्ध कार्यक्रम समस्या सोडवण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी दिल्याने आमच्यासमोर आशादायी चित्र निर्माण झाले आहे.

Latest News