सर्वांची उत्सुकता लागलेल्या पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या निवडणूकीसाठी १५ जानेवारी २०२६ ला मतदान….

पिंपरी ( ऑनलाईन परिवर्तनाचा सामना) सर्वांची उत्सुकता लागलेल्या पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या निवडणूकीसाठी १५ जानेवारी २०२६ ला मतदान होणार आहे आणि लगेचच १६ जानेवारीला मतमोजणी होणार आहे. महाराष्ट्र राज्य निवडणूक आयोगाच्या सोमवारी झालेल्या पत्रकार परिषदेत राज्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे यांनी महापालिका निवडणुकांचा कार्यक्रम अखेर जाहीर केला आहे. निवडणुकीची तारीख जाहीर होताच राजकीय क्षेत्राबरोबरच सामान्य नागरीकांमध्ये मोठा उत्साह संचारला आहे.
निवडणूकीचा कार्यक्रम खालील प्रमाणे –
नामनिर्देशन अर्ज स्वीकारणे – २३ डिसेंबर ते ३० डिसेंबर २०२५
नामनिर्देशन अर्जांची छाननी – ३१ डिसेंबर २०२५
उमेदवारी माघार – २ जानेवारी २०२६
निवडणूक चिन्ह वाटप/अंतिम उमेदवार यादी – ३ जानेवारी २०२६
मतदान – १५ जानेवारी २०२६
मतमोजणी – १६ जानेवारी २०२६
