ज्यांच्या हात जोडून पाया पडावे, नतमस्तक होऊन आशीर्वाद घ्यावेत असा कृतिशील सत्यशोधकी समाजवादी नेता पुन्हा होणे नाही..

(पुणे ::ऑनलाईन परिवर्तनाचा सामना )
ज्यांच्या हात जोडून पाया पडावे, नतमस्तक होऊन आशीर्वाद घ्यावेत असा कृतिशील सत्यशोधकी समाजवादी नेता पुन्हा होणे नाही असे प्रतिपादन ज्येष्ठ समाजवादी नेते आदरणीय प्रवीण सादबा तुपे यांनी श्रद्धेय बाबा आढाव यांच्या आदरांजली सभेत व्यक्त केले
. हडपसर, साडेसतरा नळी, दांगट वस्ती येथील समाज मंदिरामध्ये रविवार दिनांक 14 डिसेंबर रोजी झालेल्या श्रद्धांजली सभेमध्ये ते बोलत होते. यावेळी अखिल महाराष्ट्र मैराळ,दांगट ,वीर समाजसेवा संघटनेचे अध्यक्ष अनंता भोसले, भटक्या विमुक्त जमाती संघटना पिंपरी चिंचवड शहराध्यक्ष रमेश भोसले, पाटबंधारे अधिकारी सोपान जाधव, सामाजिक कार्यकर्ते सुभाष मोरे, मारुती भोसले, दिलीप भोसले, देविदास मोरे, रुपेश पवार, कुशल संघटक दीपक मोरे, सतीश भोसले, कृष्णा भोसले, मंगेश साळुंखे, पवन भोसले, स्वप्निल कदम, गणेश पोळ, दीपक कदम,समाधान पवार आदी मान्यवर उपस्थित होते
. याप्रसंगी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे सेवानिवृत्त जनसंपर्क अधिकारी व भटक्या विमुक्त जमाती संघटना शहराध्यक्ष रमेश भोसले यांनी मनोगत व्यक्त करताना बाबा आढाव हे महाराष्ट्रातील श्रमिकांना एक रुपया मध्ये पोटभर जेवण खाऊ घालणारे एकमेव कृतीशील समाजवादी नेते होते. बाबा आढाव यांनी शेतकरी, कष्टकरी, हमाल, रिक्षा चालक, काच पत्रा गोळा करणारे श्रमिक, देवदासी या समाज व्यवस्थेने नाकारलेल्या घटकांसाठी अविरत कार्य केले.
कार्य करत असताना त्यांनी डॉक्टर अनिल अवचट, डॉक्टर नीलम गोरे, पद्मश्री लक्ष्मण माने, प्राध्यापक हरी नरके, रामनाथ चव्हाण, व्यंकप्पा भोसले, शिवलाल जाधव असे अनेक कार्यकर्ते घडविले त्यांच्या जाण्याने सत्यशोधकी चळवळीमध्ये पोकळी निर्माण झाल्याचेही त्यांनी प्रतिपादन केले. सर्व समाज बांधवांच्या वतीने शेवटी साने गुरुजींच्या आभाळाची आम्ही लेकरे काळी माती आई जात वेगळी नाही आम्हा धर्म वेगळा नाही या कवितेने सांगता झाली
