लष्करातील लान्स नाईकच बनावट नोटा प्रकरण मुख्य सूत्रधार

AppleMark
AppleMark
पुणे- भारतीय चलनातील बनावट नोटा, तसेच अमेरिकन डॉलर असे मिळून विमाननगर परिसरातील संजय पार्क सोसायटीतील बंगल्यातून एकूण 87 कोटी 5 लाख 75 हजार रुपये जप्त करण्यात आले आहेत. या प्रकरणात अटक आरोपींचे मोठे रॅकेट असून लष्करातील लान्स नायक हाच मुख्य सूत्रधार असल्याची धक्कादायक माहिती पुढे आली आहे. दरम्यान अटक केलेल्या सहा जणांना 15 जूनपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचा आदेश प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी एस.के.खान यांनी दिला आहे.
शेख अलिम समद गुलाब खान (वय 36, रा. जेडीसी पार्क, प्रतिकनगर, येरवडा) असे या लान्स नाईकचे नाव असून तो संरक्षण दलातील बॉम्बे इंजीनियरिंग ग्रुप खडकी या ठिकाणी कार्यरत आहे. त्याच्यासह
सुनील बद्रीनारायण सारडा (वय 40), अब्दूल गणी रहेमत्तुल्ला खान (वय 43), अब्दुर रहेमान अब्दुलगणी खान (वय 18), रितेश रत्नाकर (वय 34) आणि तुफेल अहमद महमद इशोक खान (वय.28) यांना अशी पोलीस कोठडी झालेल्यांची नावे आहेत. लष्कराची गुप्तचर यंत्रणा आणि गुन्हे शाखेच्या पोलिसांनी पाच मोबाइल, रोख दोन लाख 89 हजार रुपये, एक हजार 200 अमेरिकन डॉलर, चलनातून बाद झालेल्या एक हजार रुपयांच्या 13 नोटा, एक कार आणि इतर साहित्य जप्त केले आहे. जप्त करण्यात आलेल्या चलनामध्ये दोन हजार, एक हजार, पाचशे रुपयांच्या नोटा आहेत. त्यांच्यावर ‘चिल्ड्रन बॅंक ऑफ इंडिया’ असे म्हटले आहे