Online ”गांजा” विकणारी टोळीचा पर्दाफाश


मुंबई : मुंबई क्राईम ब्रॅंचने कॉलेज तरुणांना ऑनलाइन गांजा विकणारी टोळीचा पर्दाफाश केला आहे. पोलिसांना सापळा रचून दोघांच्या मुसक्या आवळल्या आहेत.
दोन जण उच्च प्रतीचा गांजा (अंमली पदार्थ) विक्री करण्यासाठी मुंबईत येणार असल्याची गोपनिय माहिती सहाय्यक पोलिस निरीक्षक सुधीर जाधव यांना मिळाली होती. सदर माहितीची योग्य ती शहानिशा करून आरोपींना अटक करण्यात आली. कारवाई करण्याबाबत वरिष्ठांकडुन आदेश प्राप्त झाले होते.
वरिष्ठ पोलिस निरीक्षक महेश देसाई यांनी त्यांच्या मार्गदर्शनाखाली पोसिल निरीक्षक संजीव गावडे व इतर सहकाऱ्यांनी टर्नर रोडवर मारवा भवन कंपाऊंड जवळ फुटपाथ वरील स्ट्रीट लाईटजवळ संशयास्पद हालचाल करताना आढळले. त्यांची अंगझडती घेतली असता त्यांच्याकडे एकूण 224 ग्रॅम वजनाचा उच्च प्रतीचा गांजा आढळून आला. ऑनलाईन विक्रीच्या इराद्यानं आणलेल्या गांचाची किंमत अंदाजे 5, 37,600 रुपये आहे. दोन्ही आरोपींविरुद्ध वांद्रे पोलिस स्टेशनमध्ये अंमली पदार्थविरोधी कायद्यातंर्गत गुन्हा दाखल केला करण्यात आले आहे.
दरम्यान, कॉलेज तरुणांना ऑनलाइन गांजा विकणारी टोळी सक्रिय असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. मुंबई क्राईम ब्रॅंचचे अधिकारी आरोपींची कसून चौकशी करत आहे. मुंबईत गांजा विकणाऱ्या टोळीचं जाळं किती पसरलं आहे, याबाबत पोलिस माहिती घेत आहेत.