टोकियो ऑलिम्पिकमध्ये भारतीय पुरुष हॉकी संघाने पुन्हा एकदा इतिहास घडवीला


टोकियो टोकियो ऑलिम्पिकमध्ये भारतीय पुरुष हॉकी संघाने पुन्हा एकदा इतिहास रचला आहे. 41 वर्षाची प्रतिक्षा संपवत भारताने हॉकीमध्ये कांस्यपदक मिळवले आहे. भारतीय हॉकी संघाला ऑलिम्पिकमध्ये शेवटचे पदक 1980 मध्ये मॉस्को येथे मिळाले होते, याचे नेतृत्व वासुदेवन भास्करन यांनी केले होते.
दरम्यान, टोकियो ऑलिम्पिकमध्ये कांस्यपदकाच्या लढतीत भारतीय पुरुष संघाने 5-4 असा पराभव केला आहे. भारतीय संघाने दुसऱ्या क्वार्टरमध्ये 3-1 ने पिछाडीवर असताना जोरदार पुनरागमन करत 4 गोल केले. भारताकडून सिमरनजीत सिंगने 17व्या आणि 34 व्या, हार्दिक सिंह (27 व्या), हरमनप्रीत सिंग (29 व्या) आणि रुपिंदर पाल सिंग (31 व्या) यांनी मिनटांत गोल केले. मात्र, चौथ्या क्वार्टरमध्ये जर्मनीने दुसरा गोल केला आणि स्कोअर 5-4 केला
भारतीय संघाला विजयाच्या शुभेच्छा देताना पंतप्रधान मोदींनी सांगितलं की, ‘भारताला आपल्या हॉकी संघाचा अभिमान आहे.’ भारताने एका रोमहर्षक सामन्यात जर्मनीला 5-4 ने पराभूत करून ऑलिम्पिकमध्ये कांस्यपदक पटकावलं आहे.
मोदींनी ट्विटमध्ये असं म्हटलं की,’ऐतिहासिक! आजचा दिवस प्रत्येक भारतीयाच्या आठवणीत राहील. कांस्य पदक भारतात आणणाऱ्या पुरुष हॉकी संघाचे अभिनंदन. त्यांच्या या कामगिरीने त्यांनी संपूर्ण देशाचे, विशेषता तरुणाईचे लक्ष वेधून घेतले आहे. भारताला आपल्या हॉकी संघाचा अभिमान आहे.’
तुम्हीह टप्प्यात आणून कार्यक्रम केलात, अशा आगळ्यावेगळ्या शुभेच्छा जयंत पाटलांनी दिल्या आहेत. जयंत पाटलांच्या या राजकीय टच असलेल्या शुभेच्छांची सध्या एकच चर्चा रंगली आहे. तब्बल 41 वर्षांचा लॉकडाऊन फोडत भारतीय हॉकी संघाने कांस्य पदक मिळविलं आहे.
त्यामुळे देशभरातून हॉकी संघावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. त्यातच जयंत पाटलांनी हटके शुभेच्छा दिल्याने या शुभेच्छांची जोरदार चर्चा रंगली आहे. तुम्ही टप्प्यात आणून कार्यक्रम केलात… अभिनंदन टीम इंडिया. आज 41 वर्षाने हॉकी संघाला कांस्यपदक मिळवता आले आहे. हॉकी संघाने मिळवलेलं हे यश भारतीयांचा उर भरून आणणारे आहे, असं पाटील यांनी म्हटलं आहे.
‘सुवर्ण’युगाच्या दिशेने नवी सुरुवात
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही हॉकी संघाला शुभेच्छा दिल्या आहेत. 41 वर्षांची प्रतिक्षा… प्रयत्न… परिश्रमानंतर मिळालेल्या या यशाचा आनंद अवर्णनीय आहे. या पदकाने देशाचा गौरव वाढला असून भारतीय हॉकीच्या ‘सुवर्ण’युगाच्या दिशेने ही नवी सुरुवात ठरेल, अशा शब्दात उपमुख्यमंत्री तथा महाराष्ट्र ऑलिंपिक संघटनेचे अध्यक्ष अजित पवार यांनी ऑलिंपिक कांस्यपदक विजेत्या भारतीय पुरुष संघाचे अभिनंदन केले आहे.
भारतीय पुरुष हॉकी संघाने संघर्षपूर्ण खेळ करत ऑलिंपिक कांस्यपदक जिंकल्याबद्दल संघातील खेळाडू, प्रशिक्षक व त्यांच्या सहकाऱ्यांचे पवार यांनी अभिनंदन केले आहे. भारतीय पुरुष हॉकी संघाने कधीकाळी ऑलिंपिकची आठ सुवर्णपदकं जिंकली होती. 1980 च्या शेवटच्या पदकानंतर पदक जिंकण्यासाठी आजपर्यंत प्रतिक्षा करावी लागली.
गेल्यावेळच्या कांस्यपदक विजेत्या जर्मनीविरुद्ध 1-3 अशा गोल पिछाडीवर असतानाही संघाने 5-4 गोलफरकाने मिळवलेला विजय हा दूर्दम्य इच्छाशक्ती, संघभावना, कठोर परीश्रमांचे फळ आहे. भारतीय खेळाडूंनी आज देशवासियांची मने जिंकली आहेत. मी सर्व खेळाडूंचं, प्रशिक्षकांचं, व्यवस्थापक, सपोर्ट स्टाफचं अभिनंदन करतो. भविष्यातील सुवर्ण कामगिरीसाठी शुभेच्छा देतो. अशा शब्दात त्यांनी कौतुक केले आहे.