कोरोना व्हायरसच्या महामारीने ”भारत पाचव्या स्थानावर”

नवी दिल्ली – कोरोना व्हायरसच्या महामारीने  सर्वाधिक धुमाकूळ घातलेल्या जगातील देशांच्या यादीत आता भारत पाचव्या क्रमांकांवर गेला आहे. कोरोनाग्रस्तांच्या या यादीत भारताने कालच स्पेनला मागे टाकले. देशात कोरोनाग्रस्तांची संख्या २ लाखांहून अधिक झाली आहे. अमेरिकेतील जॉन्स हापकिन विश्वविद्यालयाच्या माहितीनुसार भारतात कोरोनाग्रस्तांची संख्या २ लाख ४५ हजार ६७० झाली असून ६,६०० हून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे.

गेल्या २४ तासांत भारतात कोरोनाग्रस्तांच्या संख्येत झालेल्या वाढीमुळे भारताने इटली आणि स्पेनला मागे टाकले आहे. अमेरिका, ब्राझील, रशिया आणि इंग्लंड हे चारच देश आता भारताच्या पुढे आहेत. या विश्वविद्यालयाच्या आकडेवारीनुसार स्पेनमध्ये सध्या २ लाख ४१ हजार ३१० कोरोनाचे रुग्ण आहेत. भारताच्या केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या माहितीनुसार शनिवारी २४ तासांत कोरोनाचे देशात ९ हजार ८८७ नवे रुग्ण सापडले. तर २९४ जणांचा मृत्यू झाला. त्यामुळे मृतांचा आकडा ६ हजार ७४२ झाला आहे. देशात आतापर्यंत कोरोनाचे २ लाख ३६ हजार ६५७ रुग्ण असून सलग तिसऱ्या दिवशी ९ हजारांपेक्षा जास्त नव्या रुग्णांची भर पडली असल्याचे या अधिकाऱ्यांनी सांगितले.

Latest News